AranyaLipee Logo
AranyaLipeeNature's Own Script
Wildlife Safari
AranyaLipee Logo
अरण्यलिपी

AranyaLipee - अरण्यलिपी

अरण्य म्हणजे जंगल आणि लिपी म्हणजे भाषेला लिखित स्वरूप देणारी लेखन पद्धती. थोडक्यात अरण्यलिपी म्हणजे जंगलाची भाषा.

जंगलामधील प्राणी, पक्षी, जलचर आणि वनस्पती तसेच निसर्गात वावरणारे असंख्य कीटक तथा जीवजंतू यांच्याबद्दल जाणून घेणे व निसर्गाच्या खुणा समजून घेण्याची कला म्हणजेच AranyaLipee - अरण्यलिपी होय.

आज चहूदिशांना शहरीकरण होत असताना उरलीसुरली ही निसर्गसंपदा कशी वाचवली गेली पाहिजे याबद्दलची अधिकाधिक माहिती सोप्या, सहज भाषेतून जनमानसापर्यंत पोहोचवण्याचे माध्यम म्हणजेच अरण्यलिपी.

माणूस हा अन्नसाखळीमध्ये कधीच अग्रस्थानी नव्हता आणि नसला ही पाहिजे. मानवी वर्चस्वामुळे हताहत झालेल्या माणसेतर जीवसृष्टीचे संवर्धन कसे करता येईल व येणाऱ्या पिढ्यांसाठी त्याचे जतन कसे करता येईल याकरिता झटणारा समूह म्हणजे अरण्यलिपी.

आमची संकल्पना

एक वैचारिक मूल

अरण्यलिपी हे नेहा व सौरभ देशपांडे या एका मराठमोळ्या जोडप्याचे वैचारिक मूल म्हणजेच Brain Child आहे.

अन्वेषण - प्रात्यक्षिक माहिती - संवर्धन

Exploration - Practical Information - Conservation

याद्वारे वनसंपदेचे जतन कसे करता येईल याकरिता सुरू केलेले YouTube Channel म्हणजेच AranyaLipee - अरण्यलिपी.

आमचा जंगल प्रवास

जंगलाच्या वाटेवर...

नेहा, सौरभ आणि त्यांची मुलगी शैवी या तिघांनी जवळ जवळ १२ व्याघ्र प्रकल्प पादाक्रांत केलेले आहेत.

ज्यामध्ये प्रामुख्याने जिम कॉरबेट, कान्हा, पेंच (महाराष्ट्र व मध्य प्रदेश), बांधवगड, ताडोबा, सातपुडा, पन्ना, झालाना, बंदिपूर, राजाजी आणि रणथंभोर अशा अनेक राष्ट्रीय उद्यानांचा समावेश आहे.

अरण्यलिपीत तुम्हाला काय मिळेल?

🐅

वन्यजीव सफारी

भारतातील प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प आणि वन्यजीव क्षेत्रांची माहिती.

🎥

प्रवास व्लॉग्स

आमच्या YouTube चॅनेलद्वारे जंगलाचा आणि वन्यजीवनाचा अनुभव.

📷

वन्यजीव छायाचित्रण

भारतातील जंगलांमधील वन्यजीवनाचे अविस्मरणीय क्षण.

🌿

संवर्धन

जबाबदार पर्यटन आणि वन्यजीव संवर्धनाला प्रोत्साहन देणाऱ्या कथा.

आमची दृष्टी

जंगल, वन्यजीव आणि निसर्ग यांच्याशी असलेले आपले नाते अधिक घट्ट व्हावे आणि पुढील पिढ्यांसाठी ही अमूल्य नैसर्गिक संपदा जतन व्हावी, हीच अरण्यलिपीची मनापासूनची इच्छा आहे.